Just Another WordPress Site Fresh Articles Every Day Your Daily Source of Fresh Articles Created By Royal Addons

Popular Posts

  • All Post
  • Beauty
  • D Y Patil
  • Gokul
  • Kolhapur police
  • Lifestyle
  • Photography
  • Satej Patil
  • Travel

Categories

Edit Template

लर्न, कोलाब्रेट आणि एक्सलन्स ही यशाची त्रिसूत्री

तंत्रज्ञानाच्या युगामध्ये लर्न, कोलाब्रेट आणि एक्सलन्स या त्रिसूत्रीचा वापर करून आयुष्यात यशस्वी व्हा. फक्त आपल्या शाखेपुरत मर्यादित न राहता अनेक विषयात पारंगत व्हा, असा कानमंत्र ‘मौरीटेक ‘ हैद्राराबादचे असोसिएट डायरेक्टर रितुराज टी. पाटील यांनी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दिला. डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये आयोजित ‘टेक्नोत्सव २०२५’ च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. राष्ट्रीय स्तरावरील या दोन दिवसीय स्पर्धेत विविध राज्यातील 1800 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज संजय पाटील यांच्याहस्ते स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.

रितुराज टी. पाटील म्हणाले, हा फक्त टेक्नॉलॉजीचा इव्हेंट नाही तर कोलाब्रेट लर्निंग इव्हेंट आहे. ही खुप मोठी संधी तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे, यासाठी फक्त प्रत्येकाकडे शिकण्याचा भूक हवी. सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे, यामध्ये विद्यार्थ्यांनी फक्त आपल्या शाखेपुरते मर्यादित न राहता, बहू शाखीय ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे.

प्राचार्य संतोष चेडे यांनी, सध्याचे युग हे स्पर्धेचे असून खूप मोठी आव्हानं समोर आहेत. उद्योगांमध्ये नेमक्या कोणत्या अडचणी आहेत त्या समजावून घ्या आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमचे नॉलेज मर्यादित ठेवू नका, त्याचा उद्योग विश्वाला फायदा करून द्या असे आवाहन त्यांनी केले.

या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, गोवा आदी राज्यातून पंधराशेहुन अधिक स्पर्धक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत सिव्हिल विभागाकडून सेतू बांधा रे, सी.एस.ई विभागाकडून अँड्रॉइड ॲप डेव्हलपमेंट कॉम्पिटिशन, आर्किटेक्चर विभागाकडून अनसिंगकेबल डिझाईन, द फ्लोटिंग चॅलेंजेस, एआयएमएल कडून  लॉन्च पॅड (शार्क टॅंक), इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रमुनिकेशन विभागाकडून रोबो सॉकर, केमिकल विभागाकडून प्रोजेक्ट कॉम्पिटिशन, मॉडेल कॉम्पिटिशन, मेकॅनिकल विभागाकडून रोबो रेस, टेक डिबेट अशा एकूण आठ विभागाकडून विविध प्रकारात ही स्पर्धा घेण्यात आल्या. 

सर्व विभागातील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकांना मिळून एकूण अडीच लाखांची बक्षिसे प्रदान करण्यात आली. संस्थेचे विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते जी त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी कार्यकर्ते संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, डॉ. अजित पाटील, समन्वयक डॉ. प्रशांत जगताप,  डॉ. कपिल कदम, अधिष्ठाता (संशोधन) डॉ. अमरसिंह जाधव यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, स्पर्धक विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.

Share Article:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • All Posts
  • Beauty
  • D Y Patil
  • Gokul
  • Kolhapur police
  • Lifestyle
  • Photography
  • Satej Patil
  • Travel
कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर आ.विनय कोरे तांदुळवाडीत ; कुटुंबीयांना दिला धीर

July 26, 2025/

तांदुळवाडी (ता. वाळवा, जि. सांगली) येथील बांधकाम क्षेत्रातील उद्योजक आणि कंत्राटदार हर्षल पाटील यांनी बुधवार, दिनांक २३ जुलै २०२५ रोजी...

गोकुळचे चेअरमन व संचालकांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी भेट, दुग्ध व्यवसायाच्या विस्तारासाठी पाठिंबा मिळणार!

June 15, 2025/

गोकुळ ही केवळ एक दुग्ध संस्था नसून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्याची आधारभूत यंत्रणा आहे. तिचा विकास म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया अधिक...

गोकुळच्या विस्तारासाठी नविद मुश्रीफांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी विशेष भेट

June 15, 2025/

राज्य सरकारकडून सहकार क्षेत्रातील गोकुळला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) चे नूतन चेअरमन नविद मुश्रीफ...

गोकुळचं लक्ष म्हैस दुधाच्या बाजारपेठेवर; उत्पादन वाढीसाठी नवीन योजना राबणार

June 15, 2025/

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे वरिष्‍ठ अधिकारी, दूध संकलन विभागाचे अधिकारी व सुपरवायझर यांची तालुकानिहाय आढावा मिटिंग चेअरमन नविद...

कोल्हापूरच्या वैद्यकीय क्षेत्राचा सन्मान उंचावला ; डी. वाय. पाटील हॉस्पिटल ‘बेस्ट हॉस्पिटल विथ मेडिकल कॉलेज ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित

June 15, 2025/

कोरोना महासंकटाच्या काळात डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ने आपला संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोरोना रुग्णसेवेसाठी समर्पित...

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या डॉ. जयवंत गुंजकर यांचीइंडियन केमिकल सोसायटीकडून लाइफ फेलो म्हणून निवड

June 11, 2025/

कोल्हापूरडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे संशोधक डॉ. जयवंत एल. गुंजकर यांची ‘इंडियन केमिकल सोसायटीच्यावतीने लाइफ फेलो’ म्हणून निवड झाली आहे....

डी. वाय. पाटील विद्यापिठाच्या डॉ. अर्पिता पांडे तिवारी यांचीन्यूकॅसल युनिव्हर्सिटीमध्ये व्हिजिटिंग अकॅडमिक म्हणून निवड

June 11, 2025/

कोल्हापूर – डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूरच्या सेंटर फॉर इंटर्डिसिप्लिनरी रिसर्चमधील मेडिकल बायोटेक्नॉलॉजी आणि स्टेम सेल्स व रिजनरेटिव्ह मेडिसिन...

Load More

End of Content.

About

विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख तसेच महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक माहिती मॅक्स मराठी मिळते 

© 2023 Created with MAX MARATHI