गोकुळ ही केवळ एक दुग्ध संस्था नसून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्याची आधारभूत यंत्रणा आहे. तिचा विकास म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया अधिक बळकट करणं आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.
गोकुळचे नूतन चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन, संचालक मंडळ व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे उपमुख्यमंत्री पवार यांची सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी गोकुळतर्फे उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.
या भेटीप्रसंगी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, तसेच गोकुळचे अनेक संचालक उपस्थित होते. यावेळी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचाही गोकुळतर्फे सन्मान करण्यात आला.
गोकुळतर्फे उपमुख्यमंत्र्यांकडे मुंबईतील राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या जागेसंदर्भातील मागणी सादर करण्यात आली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत, “शेतकरी हिताच्या प्रत्येक कामात सरकार गोकुळच्या सोबत राहील,” असे पवार यांनी स्पष्ट केले.
तसेच राज्य सरकारकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या गाय दूध अनुदान तत्काळ वितरित करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या.चेअरमन नाविद मुश्रीफ यांनी गोकुळचा उद्देश नेहमीच शेतकरी हित आणि संस्थेचा सक्षम विस्तार हा राहिला आहे. उपमुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन आमच्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरेल.असा आशावाद व्यक्त केला.
या भेटीला गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, तसेच कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले व वाशी शाखा डेअरी व्यवस्थापक दयानंद पाटील उपस्थित होते.