तांदुळवाडी (ता. वाळवा, जि. सांगली) येथील बांधकाम क्षेत्रातील उद्योजक आणि कंत्राटदार हर्षल पाटील यांनी बुधवार, दिनांक २३ जुलै २०२५ रोजी आत्महत्या केली. या दुःखद घटनेनंतर आज आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी तांदुळवाडी येथे भेट देत पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि त्यांना या संकटातून सावरण्याचे धैर्य दिले.
हर्षल पाटील यांनी तांदुळवाडी परिसरात जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेचे काम अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पूर्ण केले होते. त्यांच्या कामातील चिकाटी, पारदर्शकता आणि संघर्ष ऐकून आमदार कोरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “ही घटना मन हेलावून टाकणारी असून पाटील कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती लाभो,” अशी भावना व्यक्त केली.
या भेटीप्रसंगी महाराष्ट्र साखर संघाचे अध्यक्ष पी.आर. पाटील, वारणा साखर कारखान्याचे संचालक किशोर पाटील, संदीप पाटील, वारणा दूध संघाचे संचालक लालासो पाटील, बी.के. पाटील, संग्राम पाटील, शिवाजी पाटील, बाबासाहेब पाटील, उपसरपंच शशिकांत पाटील, रमेश पाटील, मयुर पाटील, बाळकृष्ण तोडकर, विनायक मोटे, प्रकाश पाटील तसेच तांदुळवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.