Just Another WordPress Site Fresh Articles Every Day Your Daily Source of Fresh Articles Created By Royal Addons

Edit Template

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये ‘टेक्नोलॉजिया’ उत्साहात

विद्यार्थ्यामधील चिकित्सक वृत्ती आणि नवकल्पना मांडण्याची क्षमता यामुळे संशोधन क्षेत्रात मोठे योगदान मिळत आहेत. ही संशोधनवृत्ती कायम जोपासा. जीवनात यशस्वी होण्यासाठी कम्फर्ट झोन मधून बाहेर पडा, असे आवाहन वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबईचे ग्रुप डायरेक्टर डॉ. उदय साळुंखे यांनी केले.

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या  राष्ट्रीय स्तरावरील इंटरकॉलेजिएट टेक्नो-मॅनेजमेंट स्पर्धा ‘टेक्नोलॉजिया- २०२५’ मध्ये प्रमुख अतिथी म्हणून  डॉ. उदय साळुंखे बोलत होते. डॉ. साळुंखे यांनी स्वतःच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी सांगितली. ते म्हणाले की, सातार्‍यासारख्या लहानशा गावातून मुंबईसारख्या महानगरात येणे सोपे नव्हते, पण चिकाटी व समर्पणामुळे आज या पदावर पोहचू शकलो. 

या स्पर्धेत विविध महाविद्यालयांतील तब्बल ७४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यात आठ अनोख्या आणि स्पर्धात्मक कार्यक्रमांचा समावेश होता. ‘शार्क टॅंक’ स्पर्धेमध्ये डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कोल्हापूरने प्रथम क्रमांक पटकावला, तर न्यू कॉलेज, कोल्हापूर उपविजेता ठरले. ‘कोड शफल’मध्ये डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीने विजेता तर केआयटी कॉलेज उपविजेता ठरले. डिबेट स्पर्धेत सांगलीच्या वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने प्रथम तर केआयटीने द्वितीय स्थान मिळवले. एक्सपांडेबल्स स्पर्धेत डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट विजेते तर संजय घोडावत युनिव्हर्सिटी उपविजेते ठरले.

मिनी प्रोजेक्ट मध्ये न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कोल्हापूर विजेते तर डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी दुसऱ्या स्थानी राहिले. आय पी एल ऑक्शन स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटने पटकावला. बीजीएमआय स्पर्धेत आष्टा येथील अण्णासाहेब डांगे आयटीआय विजेते ठरले, तर डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटने दुसरा क्रमांक मिळवला. पी इ एस स्पर्धेचे विजेते न्यू पॉलिटेक्निक, कोल्हापूर तर उपविजेते डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ठरले.

प्रत्येक विजेत्या संघाला ६ हजार रुपये तर उपविजेत्यांना ३००० रुपये रोख, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देण्यात आले.
यावेळी कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी मार्गदर्शन केले. स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित पाटील,यांनी स्पर्धेची सविस्तर माहिती दिली आणि प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.

Share Article:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • All Posts
  • Beauty
  • Lifestyle
  • Photography
  • Travel
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये ‘टेक्नोलॉजिया’ उत्साहात

May 11, 2025/

विद्यार्थ्यामधील चिकित्सक वृत्ती आणि नवकल्पना मांडण्याची क्षमता यामुळे संशोधन क्षेत्रात मोठे योगदान मिळत आहेत. ही संशोधनवृत्ती कायम जोपासा. जीवनात यशस्वी...

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठातबौद्धिक संपत्ती अधिकार कक्षाची स्थापना

May 11, 2025/

डी.वाय.पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाने मायक्रेव्ह कन्सल्टंसी अँड सर्व्हिसेस सोबत बौद्धिक संपत्ती अधिकार (आयपीआर) संबंधित सेवा आणि संशोधन क्षेत्रातील नवकल्पनांसाठी...

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीचाएज्युलाईन्स कन्सलटंटशी सामंजस्य करार

May 11, 2025/

कोल्हापूरराष्ट्रीय शिक्षण धोरण- २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांना जागतिक शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी डी. वाय. पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, कोल्हापूर...

मिस चायवाली ! रोटरी सेंट्रलकडून शिवानीच्या स्वप्नांना पाठबळ !

May 11, 2025/

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल यांच्यावतीने रामानंदनगर येथील शिवानी पाटील या युवतीला एक लाख रुपये निधीतून टी स्टॉल देण्यात आला...

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा

May 11, 2025/

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आयोजित आंतर महाविद्यालय क्रीडा स्पर्धेत 98 गुण संपादन करत फिजिओथेरपी कॉलेजने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. डी....

वन हक्क संघर्ष समिती बैठकीत आमदार सतेज पाटील यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

May 3, 2025/

अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी अधिनियम 2006, 2008 व सुधारित नियम 2012 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून कोल्हापूर...

शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलाची दिशा बुधवारी ठरणार

May 3, 2025/

कोल्हापूर : नागपूर -गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली असून या राज्यव्यापी आंदोलनाची पुढील दिशा...

Load More

End of Content.

About

विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख तसेच महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक माहिती मॅक्स मराठी मिळते 

© 2023 Created with MAX MARATHI