Just Another WordPress Site Fresh Articles Every Day Your Daily Source of Fresh Articles Created By Royal Addons

Edit Template

देऊया गरजूंना साथ, सतेज पाटील यांच्या वाढदिनी मदतीचा हात

कोल्हापूर : मुलांना शैक्षणिक साहित्य वाटपापासून ते क्रिकेट स्पर्धा, कॅरम स्पर्धा, म्हशी पळवणे स्पर्धा, फळे वाटप, रक्तदान शिबिरांसह विविध उपक्रम राबवत काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांचा येत्या १२ एप्रिलला होणारा वाढदिवस भव्यदिव्य स्वरुपात साजरा करण्याचा संकल्प कार्यकर्त्याच्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला. आमदार सतेज पाटील यांचा येत्या १२ एप्रिलला ५३ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने वाढदिवसाचे नियोजन करण्यासाठी अजिंक्यतारा कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देताना हार पुष्पगुच्छ आणू नयेत त्या ऐवजी गरजू विद्यार्थ्यांना देण्यासाठी वह्या आणाव्यात असे आवाहन संयोजकांनी केले.

जिल्हा काँग्रेस कमिटी, विविध संघटना व तरुण मंडळांच्यावतीने सतेज क्रिकेट स्पर्धा, कॅरम स्पर्धा, म्हैशी स्पर्धा, फळे वाटप, रक्तदान शिबिर यासह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

आमदार जयंत आसगावकर म्हणाले, सतेज पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करू. यानिमित्ताने संविधान आणि महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहचवून समाजाला जागृत करण्याची गरज आहे. या वाढदिवसानिमित्त संपूर्ण जिल्हा सतेजमय करु असे आवाहन त्यांनी केले.

शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी सर्वसामान्यांना तळागाळातील कार्यकर्त्यांची काळजी घेणारा नेत्याचा वाढदिवस आहे हा वाढदिवस नाही तर एखादा सण म्हणून साजरा करा असे आवाहन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अनिल घाडगे म्हणाले, वाढदिवस एका बहुजनांच्या नेत्याचा आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला कळावे अशा पद्धतीने नियोजन करावे. भारती पवार म्हणाल्या, वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी कार्यक्रमाचा आयोजन करावे. सुनील मोदी यांनी वाढदिवसानिमित्त शिवाजी विद्यापीठाला आहे तेच नाव राहिले पाहिजे यासाठी सतेज पर्व शिवाजी विद्यापीठ हेच नाव खरं अशी मानवी साखळी आयोजित करण्यात आल्याचे सांगितले.

माजी महापौर आर. के. पोवार म्हणाले, आमदार सतेज पाटील यांनी आजवर सर्वांना भरभरून प्रेम दिले आहे त्यामुळे त्यांना साजेल असा वाढदिवस साजरा केला पाहिजे. तसेच मिरजकर तिकटी येथील अंध मुलांच्या शाळेला भोजन देणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
माजी नगरसेवक राजू लाटकर म्हणाले, सतेज पाटील यांनी आजवर केलेल्या कामाचा जयघोष आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसू दे. माजी महापौर महादेवराव आडगुळे यांनी सतेज पाटील यांनी सर्किट बेंचसाठी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने मोठे होर्डिंग उभारण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शशांक बावचकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी महापौर मारुतराव कातवरे, माजी महापौर भिमराव पोवार, सूर्यकांत पाटील-बुध्दिहाळकर, बाळासाहेब सरनाईक, चंद्रकांत यादव, गोकुळ संचालक बाबासो चौगले, शशिकांत पाटील चुयेकर, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, बाबासाहेब खाडे, पी. डी. धुंदरे, सत्यजित दिनकरराव जाधव, माजी नगरसेवक संजय मोहिते, अर्जुन माने, प्रताप जाधव, संदीप नेजदार, इंद्रजीत बोंद्रे, विजय सुर्यवंशी,राजू साबळे, विनायक फाळके, महेश बराले, मधुकर रामाणे, दिग्विजय मगदूम, बबन रानगे, रियाज सुभेदार, बिद्री साखर कारखाना संचालक एस. बी. पाटील, आर. एस. कांबळे, माजी संचालक श्रीपती पाटील, गोपाळ पाटील, शशिकांत खवरे, माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत खोत, बाबासाहेब माळी, बाजीराव पाटील, भगवान पाटील, एकनाथ पाटील, जीवन पाटील, संभाजी पाटील, बंकट थोडगे, सदाशिव चरापले संजयसिंह पाटील, विद्याधर गुरबे, सचिन घोरपडे, विनायक घोरपडे, प्रा. टी. एस. पाटील, भरत रसाळे यांच्यासह या बैठकीस जिल्ह्यातील महाविकास आघाडी, इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर मोहन सालपे यांनी आभार मानले.

Share Article:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • All Posts
  • Beauty
  • Lifestyle
  • Photography
  • Travel
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये ‘टेक्नोलॉजिया’ उत्साहात

May 11, 2025/

विद्यार्थ्यामधील चिकित्सक वृत्ती आणि नवकल्पना मांडण्याची क्षमता यामुळे संशोधन क्षेत्रात मोठे योगदान मिळत आहेत. ही संशोधनवृत्ती कायम जोपासा. जीवनात यशस्वी...

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठातबौद्धिक संपत्ती अधिकार कक्षाची स्थापना

May 11, 2025/

डी.वाय.पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाने मायक्रेव्ह कन्सल्टंसी अँड सर्व्हिसेस सोबत बौद्धिक संपत्ती अधिकार (आयपीआर) संबंधित सेवा आणि संशोधन क्षेत्रातील नवकल्पनांसाठी...

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीचाएज्युलाईन्स कन्सलटंटशी सामंजस्य करार

May 11, 2025/

कोल्हापूरराष्ट्रीय शिक्षण धोरण- २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांना जागतिक शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी डी. वाय. पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, कोल्हापूर...

मिस चायवाली ! रोटरी सेंट्रलकडून शिवानीच्या स्वप्नांना पाठबळ !

May 11, 2025/

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल यांच्यावतीने रामानंदनगर येथील शिवानी पाटील या युवतीला एक लाख रुपये निधीतून टी स्टॉल देण्यात आला...

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा

May 11, 2025/

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आयोजित आंतर महाविद्यालय क्रीडा स्पर्धेत 98 गुण संपादन करत फिजिओथेरपी कॉलेजने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. डी....

वन हक्क संघर्ष समिती बैठकीत आमदार सतेज पाटील यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

May 3, 2025/

अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी अधिनियम 2006, 2008 व सुधारित नियम 2012 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून कोल्हापूर...

शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलाची दिशा बुधवारी ठरणार

May 3, 2025/

कोल्हापूर : नागपूर -गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली असून या राज्यव्यापी आंदोलनाची पुढील दिशा...

Load More

End of Content.

About

विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख तसेच महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक माहिती मॅक्स मराठी मिळते 

© 2023 Created with MAX MARATHI