Just Another WordPress Site Fresh Articles Every Day Your Daily Source of Fresh Articles Created By Royal Addons

Edit Template

लाँग लाईफ मोती महल आयपीएलचा विजेता

कोल्हापूर : लाँग लाईफ मोतीमहल संघाने आरपीएल २०२५ क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले . तर एमडब्ल्यूजी सुपरकिंग्स संघ उपविजेता ठरला.
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल यांच्यावतीने मेरी वेदर मैदानावर प्रकाश झोतात ही स्पर्धा झाली.
लॉंग लाइफ मोती महल संघाचा कर्णधार सचिन गाडगीळ मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज , उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तर याच संघाचा राकेश घाणेकर उत्कृष्ट गोलंदाज ठरला.

अंतिम सामन्यात लॉंग लाइफ मोती महल संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित १० षटकांमध्ये १०१ धावा केल्या. कर्णधार सचिन गाडगीळने १५ चेंडूत चार षटकारांसह ३१ धावा तर सचिन परांजपे यांनी १२ धावा केल्या.
एमडब्ल्यूजी सुपरकिंग्स संघाकडून डॉ. समीर कोतवाल, दर्शन सावंत यांनी प्रत्येकी दोन तर रवी मायदेव , रवी खोत यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

प्रत्युत्तरा दाखल खेळताना एमडब्ल्यूजी सुपरकिंग्सचे खेळाडू ठराविक अंतराने बाद होत गेले. सचिन पाटील २६, कर्णधार नामदेव गुरव १४, प्रसन्न सरदेसाई ११ यांनी दुहेरी धावसंख्या उभारली. पण त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. या संघाला निर्धारित १० षटकात ५७ अशी धावसंख्या उभा करता आली.
लॉंग लाइफ मोतीमहल कडून राकेश घाणेकर दोन तर प्रवीण काजवे आणि आदर्श शेट्टी यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रोटरीचे माजी प्रांतपाल संग्राम पाटील, क्लबचे प्रेसिडेंट संजय भगत, इव्हेंट चेअरमन रवी मायदेव, बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी सेक्रेटरी रवी खोत,
इव्हेंट को- चेअरमन प्राचार्य डॉ. महादेव नरके , रविराज शिंदे, संग्राम शेवरे, निलेश पाटील,दाजीबा पाटील,अभिजित भोसले,राजेश आडके,संजय कदम, अविनाश चिकनिस, संदीप साळोखे , डॉ.अभिजित माने यांच्यासह रोटेरियन उपस्थित होते.

Share Article:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • All Posts
  • Beauty
  • Lifestyle
  • Photography
  • Travel
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये ‘टेक्नोलॉजिया’ उत्साहात

May 11, 2025/

विद्यार्थ्यामधील चिकित्सक वृत्ती आणि नवकल्पना मांडण्याची क्षमता यामुळे संशोधन क्षेत्रात मोठे योगदान मिळत आहेत. ही संशोधनवृत्ती कायम जोपासा. जीवनात यशस्वी...

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठातबौद्धिक संपत्ती अधिकार कक्षाची स्थापना

May 11, 2025/

डी.वाय.पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाने मायक्रेव्ह कन्सल्टंसी अँड सर्व्हिसेस सोबत बौद्धिक संपत्ती अधिकार (आयपीआर) संबंधित सेवा आणि संशोधन क्षेत्रातील नवकल्पनांसाठी...

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीचाएज्युलाईन्स कन्सलटंटशी सामंजस्य करार

May 11, 2025/

कोल्हापूरराष्ट्रीय शिक्षण धोरण- २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांना जागतिक शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी डी. वाय. पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, कोल्हापूर...

मिस चायवाली ! रोटरी सेंट्रलकडून शिवानीच्या स्वप्नांना पाठबळ !

May 11, 2025/

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल यांच्यावतीने रामानंदनगर येथील शिवानी पाटील या युवतीला एक लाख रुपये निधीतून टी स्टॉल देण्यात आला...

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा

May 11, 2025/

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आयोजित आंतर महाविद्यालय क्रीडा स्पर्धेत 98 गुण संपादन करत फिजिओथेरपी कॉलेजने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. डी....

वन हक्क संघर्ष समिती बैठकीत आमदार सतेज पाटील यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

May 3, 2025/

अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी अधिनियम 2006, 2008 व सुधारित नियम 2012 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून कोल्हापूर...

शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलाची दिशा बुधवारी ठरणार

May 3, 2025/

कोल्हापूर : नागपूर -गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली असून या राज्यव्यापी आंदोलनाची पुढील दिशा...

Load More

End of Content.

About

विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख तसेच महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक माहिती मॅक्स मराठी मिळते 

© 2023 Created with MAX MARATHI