Just Another WordPress Site Fresh Articles Every Day Your Daily Source of Fresh Articles Created By Royal Addons

Edit Template

डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये मणक्याची १००वी मोफत शस्त्रक्रिया यशस्वी

डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे १० रुग्णांवर मणक्याच्या अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या. ‘द
स्पाईन फाऊंडेशन, मुंबई’ च्या सहकार्याने हॉस्पिटलच्या अस्थिरोग विभागाच्यावतीने या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या उपक्रमातंर्गत करण्यात आलेल्या मणक्याच्या अतिशय गुंतागुंतीच्या मोफत शस्त्रक्रियांची संख्या १०० वर पोहचली असल्याची माहिती ‘द स्पाईन फाऊंडेशन, मुंबई’चे प्रमुख, ख्यातनाम स्पाइन सर्जन डॉ. शेखर भोजराज आणि हॉस्पिटलचे अस्थिरोग विभाग प्रमुख डॉ. एस. ए. लाड यांनी दिली.

कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात विविध कारणामुळे विशेषत: शेतकरी व कष्टकरी लोकामध्ये मणका विकाराचे प्रमाण वाढत आहे. अशा गरीब व गरजवंत रुग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठी १९ एप्रिल रोजी मोफत मणका शस्त्रक्रियाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध वयोगटातील १०  रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शस्त्रक्रियेसाठी अन्य हॉस्पिटलमध्ये सुमारे ५ ते १० लाख रुपये खर्च येतो. मात्र, डी. वाय. पाटील हॉस्पिटल व स्पाईन फाऊंडेशनच्यावतीने या सर्व शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या. शनिवारी या उपक्रमांतर्गत १०० वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

मणक्याची १०० वी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर डॉक्टर्स व सहकाऱ्यानी केक कापून आनंद साजरा केला. डॉ. शेखर भोजराज, डॉ. तुषार देवरे, डॉ. सलीम लाड यांच्याहस्ते केक कापण्यात आला. यावेळी अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. हृषीकेश मेहता, डॉ. शैलेश हडगावकर, न्यूरोसर्जन डॉ. उदय घाटे, डॉ. बी. सी. पाटील, डॉ. अमोल गोवईकर, डॉ. उमेश जैन, डॉ. सिद्धार्थ निगडे यांच्यासह स्पाईन फाऊंडेशनचे डॉक्टर्स, भूलरोग तज्ञ डॉ. संदीप कदम, उपकुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील व सहकारी उपस्थित होते.

स्पाईन फाउंडेशनचे प्रमुख डॉ. शेखर भोजराज म्हणाले, ‘द स्पाईन फाउंडेशन मुंबईच्या’वतीने डी. वाय पाटील हॉस्पिटलमध्ये गेल्या पाच वर्षांपासून स्पाईन ओपीडी आणि सर्जरी हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमातर्गत १०० हून अधिक रुग्णावर अतिशय गुंतागुंतीच्या यशस्वी शस्त्रक्रिया करता आल्याचा आनंद व समाधान आहे. मणका आजारावर मोठ्या शहरांमध्ये मिळणारे अत्याधुनिक उपचार डी. वाय पाटील हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी एन्डोस्कोपिक स्पाईन सर्जरीही केल्या जातात. गरीब व गरजवंतांनी याचा लाभ घ्यावा.

डॉ. डॉ. एस . ए. लाड म्हणाले, डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे ‘द स्पाईन फाऊंडेशन’च्या सहकार्याने मणक्याच्या आजारांवरील विशेष ओपीडी गेल्या पाच वर्षांपासून सुरु आहे. आतापर्यंत १२०० हून अधिक गरीब रुग्णाची तपासणी करण्यात आली आहे. यातील गंभीर आजार असलेल्या १०२ रूग्णावर मणक्याच्या गुंतागुंतीच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आम्हाला सांगायला अतिशय अभिमान वाटतो, द स्पाईन फाऊंडेशन मुंबई सहकार्याने मोफत स्पाईन सर्जरी करणारे डी. वाय. पाटील हॉस्पीटल हे गडचिरोलीनंतर देशातील दुसरे मोठे सेंटर बनले आहे.

कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरु डॉ. आर. के. शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने जास्तीत जास्त रुग्णापर्यंत हि सेवा पोहचविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे डॉ. लाड यांनी सांगितले.

Share Article:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • All Posts
  • Beauty
  • Lifestyle
  • Photography
  • Travel
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये ‘टेक्नोलॉजिया’ उत्साहात

May 11, 2025/

विद्यार्थ्यामधील चिकित्सक वृत्ती आणि नवकल्पना मांडण्याची क्षमता यामुळे संशोधन क्षेत्रात मोठे योगदान मिळत आहेत. ही संशोधनवृत्ती कायम जोपासा. जीवनात यशस्वी...

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठातबौद्धिक संपत्ती अधिकार कक्षाची स्थापना

May 11, 2025/

डी.वाय.पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाने मायक्रेव्ह कन्सल्टंसी अँड सर्व्हिसेस सोबत बौद्धिक संपत्ती अधिकार (आयपीआर) संबंधित सेवा आणि संशोधन क्षेत्रातील नवकल्पनांसाठी...

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीचाएज्युलाईन्स कन्सलटंटशी सामंजस्य करार

May 11, 2025/

कोल्हापूरराष्ट्रीय शिक्षण धोरण- २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांना जागतिक शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी डी. वाय. पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, कोल्हापूर...

मिस चायवाली ! रोटरी सेंट्रलकडून शिवानीच्या स्वप्नांना पाठबळ !

May 11, 2025/

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल यांच्यावतीने रामानंदनगर येथील शिवानी पाटील या युवतीला एक लाख रुपये निधीतून टी स्टॉल देण्यात आला...

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा

May 11, 2025/

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आयोजित आंतर महाविद्यालय क्रीडा स्पर्धेत 98 गुण संपादन करत फिजिओथेरपी कॉलेजने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. डी....

वन हक्क संघर्ष समिती बैठकीत आमदार सतेज पाटील यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

May 3, 2025/

अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी अधिनियम 2006, 2008 व सुधारित नियम 2012 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून कोल्हापूर...

शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलाची दिशा बुधवारी ठरणार

May 3, 2025/

कोल्हापूर : नागपूर -गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली असून या राज्यव्यापी आंदोलनाची पुढील दिशा...

Load More

End of Content.

About

विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख तसेच महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक माहिती मॅक्स मराठी मिळते 

© 2023 Created with MAX MARATHI